श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट

अध्यक्षीय मनोगत.......

साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ असणाऱ्या आपल्या कोल्हापूर या तीर्थक्षेत्राचा महिमा आपण सर्व जाणताच. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या आपल्या करवीर नगरीमध्ये साक्षात श्री दत्तगुरू माध्यान्ह भोजनासाठी येतात याहून भाग्य कोणते असेल. अशा या पवित्र ठिकाणी जगभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात पण त्यांना भोजनप्रसाद देण्यासाठी एखाद्या अन्नछत्राची सोय इथे नाही ही खंत मनाला सारखी लागत होती. या तळमळीतून करवीर निवसिनीच्या दरबारात भाविकांना मोफत भोजनप्रसाद देण्याच्या हेतूने आणि अन्नदानाचे महत्व लक्षात घेऊन सन २००८ साली श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आम्ही श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट या संस्थेचा शुभारंभ केला.सेवाभावी वृत्तीने सुरु केलेल्या आमच्या या कार्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. परगावाहून आलेले सुमारे तीन ते पाच हजार भाविक रोज आपल्या अन्नछत्रात मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेत आहेत.उत्सवकाळात हा आकडा दहा हजारांहून अधिक होतो.कितीही गर्दी असली तरी सर्वांनाच अतिशय चविष्ट व सात्विक भोजनप्रसाद मिळाल्यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर जे आनंद, समाधान व तृप्तीचे भाव दिसून येतात तोच आम्ही आमचा नफा समजतो. मंदिरापासून जवळच असणारा अद्ययावत व प्रशस्त असा सुशोभित भोजन हाल, जेवणाचा उत्तम दर्जा, स्वच्छता व टापटीप, नम्र व तत्पर सेवा या वैशिष्ट्यांमुळे आपल्या अन्नछ्त्राने कोल्हापूरच्या वैभवात मानाचा तुरा खोवला आहे.

श्री. राजू अ. मेवेकरी – जाधव

संस्थापक – अध्यक्ष

अन्नदानाचे हे पुण्यकार्य पुढेही असेच सुरु राहणार आहे. आमच्या या सत्कार्याला आपल्यासारख्या सुह्र्दय व दानशूर भाविकांचे अनमोल सहकार्य मिळाल्यामुळे अन्नदानाचे हे कार्य आजही अत्यंत यशस्वीपणे आणि अखंड सुरु आहे. आमच्या या कार्यास सर्वसामान्य जनताजनार्दनापासून नवकोट नारायणापर्यंत सर्व दानशूर भाविकांनी दिलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल आम्ही सर्वांचे शतशः आभारी आहोत.

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट ने यावर्षी आपल्या कार्याची १२ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने संस्था १२ वा वार्षिक अहवाल आपल्यासमोर सादर करीत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या अहवालातून आम्ही वर्षभरात पूर्ण केलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवीत आहोत. आमच्या या प्रवासात तुम्ही सर्व आमच्या बरोबर आहात याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आपला स्नेह व सहकार्य असेच वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा !

100000

मोफत भोजनप्रसाद

15

विशेष उपक्रम

13

वर्षे पूर्ण

2

धर्मशाळा

Testimonials

Donation

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट नूतन धर्मशाळ
Testimonial