दिवाळी फराळ वाटप

दिवाळी फराळ वाटप

भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. पण समाजात काही कुटुंब अशी आहेत कि ते केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे सण साजरा करू शकत नाहीत. त्यांच्या घरात सणादिवशी चूल देखील पेटत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यावर आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि सत्यता पडताळून पाहिल्यानंतर त्यांना दिवाळीत मोफत फराळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दरवर्षी समाजातील गरजू व गरीब कुटुंबांना आमच्याकडून मोफत फराळ वाटप करण्यात येतो. याप्रकारे त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण देण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतो.

यावर्षी अशा ६०० कुटुंबांना ३ हजार किलो फराळाचे वाटप करण्यात आले. अतिशय कौटुंबिक स्वरूपाच्या समारंभात हे फराळ वाटप कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ.माधवी प्रकाश गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध उद्योजक मा.श्री जितेंद्र के. शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिध्द उद्योजक मा.श्री. श्रीकांत गोयल, पंचगंगा बँकेचे संचालक मा.श्री. नंदकुमार दिवटे व श्री महालक्ष्मी भक्त मंडळ – धर्मशाळेचे संचालक मा.श्री. अरुण जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी भरपूर जनसमुदाय उपस्थित होता. या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सर्वांनी संस्थेचे अभिनंदन केले.

दिवाळी फराळ वाटप
दिवाळी फराळ वाटप
दिवाळी फराळ वाटप
दिवाळी फराळ वाटप
दिवाळी फराळ वाटप
दिवाळी फराळ वाटप
दिवाळी फराळ वाटप
दिवाळी फराळ वाटप