श्री महालक्ष्मी अंबाबाई, कोल्हापूर

संपूर्ण भारतभर श्रीदेवीचे ५१ शक्तिपीठे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत. या पीठांमध्ये कोल्हापूर, तुळजापूर, माहूर-वणी या पीठांचा समावेश असून त्यामध्ये माहूर-वणी हे पूर्ण शक्तीपीठ आहे.

श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी रणरागीणी ताराराणी यांनी करवीर संस्थानाची स्थापना केली. लोकराजा राजर्षि शाहू छत्रपती महाराज यांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या संकल्पनेतून निर्माण झालेली ही नगरी म्हणूनच देवीचे मातृपीठ असून या नगरीस कलानगरी असे संबोधतात.श्री महालक्ष्मी अंबाबाई दर्शनासाठी हिंदूस्थानच्या काना-कोपर्‍यातून लाखो भक्त दरवर्षी कोल्हापूर नगरीस भेट देत असतात. यथासांग देवीचे दर्शन घेऊन जात असतात. परंतु आमच्यामनामध्ये एक खंत सलत होती. ती म्हणजे अन्नछत्राची. हिंदुस्थानातील विविध तीर्थक्षेत्रे  व धार्मिक ठिकाणी अन्नदानाची परंपरा आहे. अन्नदान हेच पुण्यदान या श्रध्देतून शेगांव शिर्डी, अक्कलकोट, तसेच इतर बर्‍याच मंदिराठिकाणी अन्नदान केले जाते पण आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये ही व्यवस्था नाही. म्हणून समविचारी कार्यकर्ते एकत्र येऊन जानेवारी २००८ शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रथम प्रत्येक पौर्णिमेदिवशी अन्नदान सुरू केले. दोन वर्षानंतर हा उपक्रम यशस्वी झालेनंतर जानेवारी २०१० साली प्रत्येक शुक्रवारी हा अन्नदानाचा उपक्रम सुरु केला. यासाठी स्थानिक व परस्थ भक्तांनी आपल्या कुवतीनुसार आर्थिक व वस्तूरुपात मदत केली म्हणून हा उपक्रम यशस्वी करु शकलो. नंतर भक्तांचा वाढता प्रतिसाद, दुरवर झालेली चांगली ओळख या बळावर आम्ही जानेवारी २०११ सालापासून प्रत्येक मंगळवार व प्रत्येक शुक्रवार अन्नछत्र सुरू केले. हे काम थोडे धाडसाचे होते. पण माझ्या सर्व सहकारी मित्रांनी भरपूर मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे चालू ठेवला आहे. प्रत्येक मंगळवार व शुक्रवार चालू असलेला अन्नदानाचा उपक्रमाद्वारे एक दिवशी अंदाजे ८०० ते १००० भक्त अन्नदान ग्रहण करतील. अशी व्यवस्था केली आहे. उत्कृष्ठ नियोजन व स्वादिष्ट भोजन याद्वारे अल्पावधितच एक चांगला उपक्रम या द्वारे प्रसिध्दी मिळत आहे. येणारे भक्तगण संतुष्ट होऊन जातात. भविष्यात याची व्याप्ती वाढविण्याचा विचार असून आपण ही या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे व आपल्या वेळेनुसार सहकुटुंब आपण या उपक्रमास भेट द्यावी ही नम्र विनंती.

Powered By Indic IME