महत्वाचे वार्षिक उत्सव

श्री महालक्ष्मी देवीचे महत्वाचे वार्षिक उत्सव

शारदीय नवरात्रोत्सव :

करवीर निवासीनी श्री अंबाबाईचा प्रमुख वार्षिकोत्सव म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव! अश्‍विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापनेपासून सुरु होणारा हा उत्सव अश्‍विन शुध्द नवमी म्हणजेच खंडेनवमीपर्यंत चालतो. या कालावधीत श्री जगदंबेने कोलासुर व अन्य असुरांशी युध्द करुन नवमीच्या दिवशी त्यांच्यावर संपूर्ण विजय मिळविला अशी आख्यायिका आहे. म्हणूनच शक्तीपुजनातील हा सर्वात महत्त्वाचा कालावधी मानला गेला आहे. घटस्थापना झाल्यानंतर तोङ्गेची सलामी दिली जाते. नवरात्रोत्सवात दररोज रात्रौ ९.३० वाजता देवीची पालखी प्रदक्षिणा होते. या कार्यक्रमात देवीची उत्सवमुर्ती चांदीने मढविलेल्या व ङ्गुलांनी सजविलेल्या पालखीत बसवून मंदिर प्रदक्षिणा केली जाते. या सोहळ्यास असंख्य भाविक गर्दी करतात.
अश्‍विन शुध्द पंचमीला म्हणजेच ललिता पंचमीला श्री देवी पालखीत बसून शहराबाहेर असलेल्या श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीस जाते. याबाबतची आख्यायिका अशी-नवरात्रात नऊ दिवस असुरांबरोबर चाललेल्या घोर युध्दात देवीच्या नऊ सखी(नवदुर्गा) तिच्या मदतीला धावुन आल्या. यामध्ये सर्वात प्रिय अशी त्र्यंबोली देवीही होती. युध्दात तिने अत्यंत पराक्रमाने कुष्मांडासुराचा वध केला. परंतु श्री अंबाबाईने तिचा योग्य सन्मान केला नाही अशी भावना झाल्याने ती रुसुन शहराच्या पुर्वेस असलेल्या टेकडीवर जाऊन राहिली. श्री अंबाबाई पश्‍चिमेकडे तोंड करुन बसलेली आहे. तर श्री त्र्यंबोली देवी ही तिच्याकडे पाठ करुन म्हणजेच पुर्वेकडे तोंड करुन बसलेली आहे. प्रतिवर्षी ललिता पंचमीला श्री अंबाबाई आपल्या प्रिय सखीचा रुसवा काढण्यासाठी तिला भेटावयास त्र्यंबोलीकडे जाते. या दिवसाला कोल्हापूरात त्र्यंबोली पंचमी किंवा कोहाळ पंचमी म्हणूनही संबोधली जाते. या दोन सखींच्या भेटीचा सोहळा अत्यंत हृदयंगम असतो. त्यानंतर कुष्मांडासुराच्या वधाचे प्रतिक म्हणुन कोहळा ङ्गोडला(कुष्मांडबली दिला) जातो. गावकामगार पाटील घराण्यातील कुमारीकेच्या हातातील त्रिशुलाने कोहळा ङ्गोडण्याची परंपरा आहे. ङ्गोडलेल्या कोहळ्याचा तुकडा िमिळविण्यासाठी झुंबड उडते. त्यानंतर श्री अंबाबाई पुन्हा पालखीतुन भक्तजनांच्या पायघड्या व आरत्यांचा स्विकार करीत मंदिरात परतते.
अश्‍विन शुध्द अष्टमीला जगदंबेचा जागर असतो. याच दिवशी रात्रभर युध्द करुन जगदंबेने कोलासुरास ठार केले असे मानले जाते. या दिवशी रात्री जगदंबा सिंहासनारुढ होऊन नगरप्रदक्षिणेस निघते. देवीच्या या आसनास ‘वाहन’ असे म्हणतात. करवीर संस्थानच्या छत्रपती घराण्यातील राजस्त्रिया जुना राजवाडा येथे वाहनाचे पारंपारिक पध्दतीने स्वागत करतात. महाराणी साहेबांच्या हस्ते जगदंबेची खणानारळाने ओटी भरुन आरती केली जाते. त्यानंतर वाहन भक्तांच्या आरत्यांचा व स्वागताचा स्विकार करीत मंदिरात पोहोचते. यानंतर वाहन भक्तांच्या आरत्यांचा व स्वागताचा स्विकार करीत मंदिरात पोहोचते. यानंतर मंदिर बंद होते. रात्री उशिरा मंदिरात जागराचे धार्मिक कार्यक्रम सुरु होतात. यामध्ये प्रामुख्याने सप्तशती व लक्ष्मीनारायण हृदय या स्तोत्रांचे हवन होते. हे हवन रात्रभर चालते व सकाळी त्याची पुर्णाहुती होते. पुर्णाहुती झाल्यानंतरच मंदिर दर्शनासाठी खुAले होते.
खंडेनवमीला पुन्हा सर्व धार्मिक विधी होऊन देव उठविले जातात व नवरात्रोत्सवाची सांगता होते.

दसरा :

नवरात्रोत्सवाच्या दुसरे दिवशीच होणार्‍या (अश्‍वीन शुध्द दशमी) विजया दशमीस नवरात्रोत्सवाचाच भाग मानतात. परंतु प्रत्यक्षात हा वेगळा उत्सव आहे. कोल्हापूरचा पारंपारिक दसरा महोत्सव सुप्रसिध्द आहे. या दिवशी श्री अंबाबाई सिमोल्लंघनासाठी मंदिरातून पालखीतून बाहेर पडते. भवानी मंडपामध्ये गुरु महाराज व भवानी मातेच्या पालख्या येऊन मिळतात. यानंतर ही मिरवणूक छ. शिवाजी चौकातून दसरा चौकाकडे मार्गस्थ होते. करवीर संस्थान कालात या मिरवणुकीमध्ये हत्तीच्या अंबारीतुन स्वत: छत्रपती, त्यांचे सरदार-दरकदार, पायदळ, घोडदळ, चित्ते पाळणारे चित्तेवान आदि लवाजमा सहभागी होत असे. त्याकाळी हा उत्सव नागरी व लष्करी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता.
पूर्वी चौङ्गाळ्याचा माळ म्हणून प्रसिध्द असलेल्या दसरा चौकात पालख्या पोहोचल्यानंतर तेथे छत्रपतींच्या खाशा स्वार्‍यांचे, त्यांच्या ऐतिहासिक मेबॅक गाडीतून आगमन होते. यावेळी पोलिस दल व स्थळ सेनेच्या वाद्यवृंदाकडून त्यांना मादवंदना दिली जाते. छत्रपतींच्या हस्ते शमीपूजन होताच बंदूकांची सलामी झडते व उपस्थित जनसमुदाय शिलंगणाचे सोने लुटण्याकरीता एकच गर्दी करतो. यानंतर पालख्या भक्तांकडून सोने स्विकारत पंचगंगा नदीकडे मार्गस्थ होतात.
या दिवशी एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक परंपरेचे निर्वहन होते, ते म्हणजे हरिजन वस्तीतून श्री अंबाबाईच्या पालखीची मार्गक्रमणा. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी घालून दिलेल्या काही महत्त्वाच्या सामाजिक पायंड्यांपैकी एक! एकीकडे संपूर्ण भारतात हरिजन व दलितांना मंदिर प्रवेश बंदी असताना राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी मात्र प्रत्यक्ष जगदंबेलाच त्यांच्या दारातून नेले. आजही मोठया आनंदाने व उत्साहाने येथे पालखीचे स्वागत केले जाते.
पंचगंगेवर आल्यानंतर तेथे शंकराचार्य, दुसरे संभाजी व राजाराम महाराज यांच्या समाध्यांसमोर श्री अंबाबाईची पालखी ठेवली जाते. याच ठिकाणी देवीचा सेनापती व कोल्हापूरचा कोतवाल श्री रंकभैरव याच्याही पालखीची भेट होते. या भेटीनंतर व मानाचे विडे दिल्यानंतर पालख्या पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ होतात. पालकी मंदिरात आल्यानंतर आरती होते व हा सोहळा समाप्त होतो.

रथोत्सव :

प्रतिवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला श्री महालक्ष्मीचा रथोत्सव साजरा होतो. यावेळी श्री जगदंबा रथारुढ होऊन नगरप्रदक्षिणा करते. हा रथ भाविक ओढतात. चैत्र पौर्णिमेला वाडी रत्नागिरी येथील महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या केदारलिंग म्हणजेच ज्योतिबाची यात्रा असते. या यात्रेस संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून लाखो भाविक एकवटतात. पौर्णिमेची यात्रा संपन्न झाल्यावर सर्वच भक्त स्वाभाविकपणे श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करवीरात येतात. या भक्तांना श्री देवीचे वैभव दिसावे तसेच सर्व भक्तांना देवीचे दर्शन मिळावे या हेतूने राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी १९१४ साली रथोत्सव सुरु करविला.
२०१० साली या लाकडी रथाला चांदीच्या पत्र्याने संपूर्ण मढविण्यात आले. याकामी सुमारे ३५० किलो चांदी लागली. ही सर्व चांदी अनेक भक्तांनी देवीस अर्पण केली होती. चांदीने मढविल्यामुळे व अत्यंत मोहक रोषणाईमुळे मुळातच भव्य असलेल्या या रथास एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले.
रथोत्सवावेळी सर्व करविरवासीयांचा उत्साह पहाण्यासारखा असतो. रथाच्या मार्गावर भव्य रांगोळ्या घालण्यात येतात. तसेच अनेक ठिकाणी मनमोहक आतषबाजी करण्यात येते. महालक्ष्मीचे हे वैभवसंपन्न रुप डोळ्यात साठविण्याकरीता अबालवृध्दांची एकच गर्दी होते.

किरणोत्सव :

श्री अंबाबाईच्या मंदिराची रचना अनेक गोष्टीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात वर्षातून दोनदा प्रत्येकी तीन दिवस होणारा किरणोत्सव. या कालावधीत मावळत्या सुर्याची किरणे महादरवाजातून प्रवेश करुन थेट मूर्तीवर पडतात. हा एक विलक्षण सोहळा असतो.
किरणोत्सवाबाबतही एक पौराणिक आख्यायिका आहे. श्री अंबाबाईचे एक रुप म्हणजे तिरुमलाई डोंगरावर वास्तव्य असणार्‍या भगवान वेंकटेशाची पहिली पत्नी देवी लक्ष्मी! ही लक्ष्मी माता पतीबरोबर झालेल्या भांडणातून आपल्या माहेरी म्हणजेच करवीरात आली व येथे राहू लागली. तिकडे भगवान वेंकटेश हे पद्मावतीवर लुब्ध झाले व त्यांनी पद्मावतीबरोबर दुसरा विवाह करण्याचे ठरविले. दुसरा विवाह करावयाचा तर पहिली पत्नी उपस्थित हवी. त्यामुळे आपल्या पहिल्या पत्नीस म्हणजेच लक्ष्मीस लग्नाचे आमंत्रण देण्याचे व तिची समजूत काढून तिला घेऊन येण्याचे काम भगवान वेंकटेशानी सूर्यनारायणावर सोपविले. हे काम पार पाडण्यासाठी सुर्यनारायण स्वत: श्री जगदंबेकडे येतात व तिला घेऊन जातात. तसेच तेथील कार्य आटोपल्यावर पुन्हा तिच्या मातृगृही सोडावयास येतात. त्यामुळे दोनवेळा किरणोत्सव होतो.
यातील विज्ञानाचा भाग असा कि, दक्षिणायन व उत्तरायणावेळी सूर्याची पृथ्वीवरील एखाद्या स्थानासमोरील सापेक्ष स्थिती ही बदलत जाते. ज्यावेळी सूर्याच्या किरणांचा कोन मंदिराच्या रचनेशी तंतोतंत जुळतो त्यावेळी सूर्यकिरणे थेट गाभार्‍यात जाऊन स्पर्श करतात. हे दृश्य अत्यंत विलोभनीय असते.

अक्षय तृतीया :

या दिवशी श्री देवी मंदिरातील गरूड मंडपामध्ये झोपाळ्यावर आरुढ होऊन हळदी-कुंकु स्विकारते.

वरदमहालक्ष्मी व्रत :

श्रावण महिन्यातील दुसर्‍या शुक्रवारी श्री देवीला सायंकाळी सूर्यास्तावेळी अभिषेक केला जतो. या एकाच दिवशी श्री देवीस सायंकाळी अभिषेक होतो. या दिवशी श्री देवीची अलंकार पूजा बांधली जात नाही.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर व या मंदिरात होणारे विविध उत्सव यांचेमुळे मंदिरात भाविक भक्त आणि पर्यटक यांची कायमच गर्दी होत असते. श्री जगदंबेच्या चरणी लीन होणार्‍या भक्ताच्या सर्व आशा आकांक्षा जगदंबा न मागताच पूर्ण करते असा भक्तांचा विश्‍वास आहे. करवीरावर व करवीरवासियांवर तिच्या कृपेचा अखंड वर्षाव होत आहे व तिचा विशेष लोभ आहे. त्यामुळेच येथे अस्मानी वा सुलतानी विपदा कधीच भयंकर रुप धारण करीत नाहीत अशी भक्तांची श्रध्दा आहे. श्री करवीर निवासिनीचा हा कृपाशिर्वाद सर्वच भूतमात्रांना

ललित पचमी :

श्री महालक्ष्मी देवीस सकाळी ७ वा आणि १० वा अभिषेक करून पालखी तोफेची सलामी दिल्यानंतर मंदिर आवारातून श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीस देवी निघते.पालखी वाजत श्री त्र्यंबोली देवीच्या देवालयात येते.तेथे दुपारी १२ वा श्रीमंत छत्रपतींच्या हस्ते कुष्मांठडबलीचा कार्यक्रम होतो.दुपारी २ वाजता श्री महालक्ष्मी देवीची पालखी त्र्यंबोलीहून परत श्री महालक्ष्मी मंदिरात आल्यानंतर आरती होते.

Powered By Indic IME