श्री महालक्ष्मीच्या वास्तव्याने पावन झालेल्या करवीर नगरीतील कोल्हापूरचे प्राचीन महालक्ष्मी मंदिर.
भारतीय संस्कृतीचा थोडासा सखोल अभ्यास केला, तरी प्रत्येक भारतीय आपल्या जीवनात काशीयात्रा झाली की जीवनाची सांगता आणि फलश्रुती झाल्याबद्दल स्वतःला धन्य मानतो ‘काशीस जावे, नित्य वदावे’ अशी म्हण आहे; परंतु याच प्रसिध्द असलेल्या उत्तर काशीमधून फार प्राचीनकाळी अगस्तीमुनी क्रोधाने बाहेर पडले.परंतु दुःखामुळे त्यांना प्रवासात मूर्च्छा येऊ लागली.तेव्हा त्यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली आणि सांगितले ‘तुझ्या वियोगाने मला अतीव दुःख झाले आहे.मी काशीला परत येणे अव्यावहारीक आहे.तेव्हा तुमचे वास्तव्य असणारे स्थान मला सांगा, तेव्हा भगवान शंकरांनी साक्षात्कार देऊन वर्णन केलेली ही ‘करवीर नगरी कोल्हापूर’ म्हणजे ‘दक्षिण काशी’ होय.