Blog

सौभाग्य सौख्यदायी श्रीकुंकूमार्चना साप्ताहिक उपासना

Posted by on Feb 2, 2016 in Uncategorized | 0 comments

महाराष्ट्रात श्रीदेवी मातेच्या साडेतीन शक्तीपीठाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. दक्षिण काशी श्रीक्षेत्र कोल्हापूर यात सर्वश्रेष्ठ आहे. कोलापुरं महास्थानं यंत्र लक्ष्मी: सदास्थिता| मातु:पुर द्वितीयंच रेणुकाधिष्ठितं परम॥ तुळजापुरं तृतीयं स्यात सप्तश्रृंग तथैव च दक्षिणकाशी कोल्हापूरची जगदंबा महालक्ष्मी (आद्यपुर्णपीठ), माहुरची रेणुकादेवी (पुर्णपीठ), तुळजापुरची तुळजाभवानी(पुर्णपीठ) वणीची सप्तश्रृंगी(अर्धपीठ) अशा साडेतीन पीठात कोल्हापूर हे आद्यपीठ आहे. इतर शक्तीपीठांपेक्षा या पीठाचे वैशिष्ठ्य म्हणजे या साक्षात निर्गुण व सर्वव्यापी परब्रह्म श्री महालक्ष्मी रुपात मुर्तीमंत उभे आहे. हिच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी, जगदंबा अर्थात सर्वसाद्या आहे. हिच्यापासून सर्व देवदेवतांची निर्मिती घडली आहे. या ठिकाणी शिवांगी गौरीमातेचे त्रिनेत्र शक्तीपीठ असून श्री महालक्ष्मी मातेचे अखंड निवासस्थान आहे. यामुळे यास महामातृक्षेत्र म्हणतात. या मातृतीर्थक्षेत्री देवीच्या कृपेसाठी काही उपासना घडल्यास तिचे ङ्गळ अनंतपट आहे. श्री दत्तात्रेयाचे अक्षय्यभिक्षाभोजन स्थान असणार्‍या करवीरी आपण यापुर्वीच श्रीमातेच्या यात्रेकरु भक्तांसाठी श्रीमहालक्ष्मीचा भोजनप्रसाद अर्थात श्री महालक्ष्मी अन्नछत्राचा आरंभ केला आहे. याचा अनेकजण लाभ घेतात व करवीरास दुवा देतात. याचेच पुण्यबल आपल्या पाठीशी आहे. वेदशास्त्र संपन्न श्री सुहास मधुकर जोशी यांचे मार्गदर्शनाखाली श्री महालक्ष्मीस प्रिय असणार्‍या श्री कुंकुमार्चन सेवेचा सर्व महिला भक्तांसाठी आरंभ केला आहे. सकल सौभाग्यलक्ष्मी, सौख्य, देवीकृपेसह अन्य कामनांचा सत्वर लाभ करुन देणार्‍या श्री देवीच्या कुंकुमार्चन उपासनेचा महिला भाविकांनी विशेष लाभ घेऊन श्रीदेवीची उपासना व अखंडकृपा साधावी. यासाठी प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत सर्वांनी श्री महालक्ष्मी अन्नछत्र, कपिलतीर्थ मार्केट, ताराबाई रोड येथे हा उपक्रम पार पडत असतो. या उपासनेसाठी सर्व साहित्य संस्थेतर्ङ्गे विनामुल्य देण्यात येते. तरी आपल्या परिचयातील भाविक महिलांपर्यंत हा उपासना उपक्रम पोहोचवून श्रीसेवेच्या उपासनेचे ङ्गळ मिळवावे ही विनंती. स्थळ : श्री महालक्ष्मी अन्नछत्र कपितीर्थ मार्केट, ताराबाई रोड, कोल्हापूर. ङ्गोन : ०२३१-२६२८८७७ महिण्यातील प्रत्येक मंगळवारी, सायंकाळी ६ ते ७ श्री देवी...

read more

घरचे प्रांगण स्वच्छ ठेवणे

Posted by on Feb 2, 2016 in Uncategorized | 0 comments

महालक्ष्मीचे प्रांगण स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे महान कर्तव्य यात शंका ती कोणती. आपली श्री महालक्ष्मी सर्वांची. तुमची आमची माता, तिचे प्रांगण स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आम्ही गेल्या वर्षी उचलली. डिसेंबर २०१४ ते डिसेंबर २०१५ या वर्षासाठी आम्ही ह्याही कामात अग्रेसर राहिलो. दररोज सकाळी दोन अणि संध्याकाळी आमचे दोन कर्मचारी प्रांगण झाडून स्वच्छ करतात. झाडलोट करणे ब्लिचींग पावडर डीडीटी पावडर ङ्गवारून किटकमुक्त प्रांगण ठेवणे ही कामे ते कर्मचारी पार पाडतात. त्यांचा पगार आणि लागणारे साहित्याचा खर्च आम्ही उचलतो. यात आम्ही स्वत:ला भाग्यवान मानतो. अप्रत्यक्षरित्या भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानास सहाय्यभुत ठरत...

read more

दिवाळीचा फराळ वाटप

Posted by on Feb 2, 2016 in Uncategorized | 0 comments

अशी एक गोष्ट सांगतात की एकदा दिवाळीच्या दिवसात नव्या राजवाड्यावर एका नोकराचा मुलगा त्याच्यासाठी दुपारचे जेवण घेऊन आला होता. योगायोगाने माणसातील राजा आणि राजांमधील माणुस’ म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या राजर्षि छ. शाहू महाराजांशी त्या पोराची अवचित गाठ पडली. राजर्षिंनी त्या पोराने ङ्गडक्यात बांधून आणलेली झुणका भाकर पाहिली आणि सह्याद्रीसारख्या विशाल अशा या माणसाच्या डोळ्यात अश्रु तरळले. दिवाळीच्या दिवशीही माझ्या प्रजेला भाकरतुकड्यावर मळकट कपड्यांवर भागवावे लागावे याची खंत त्यांच्या मनात दाटून आली. त्यांनी तबडतोब राजवाड्यावर बनविण्यात आलेले ङ्गराळाचे सर्व पदार्थ आपल्या गोर-गरीब अशा नोकरवर्गात वाटून टाकण्याची आज्ञा ङ्गर्मावली. त्या पोराला नवे कपडे देऊन पाठवून दिले. आम्ही हरघडी पावलोपावली राजर्षिंच्या कार्याचे गोडवे गातो तेंव्हा त्यांची ही एक कृती आम्हाला चेतवून गेली. नुसते गोडवे गाण्यापेक्षा काही ठोस समाजाभिमुख कृती करावी हा विचार मनात आला. आजही परिस्थितीत ङ्गार मोठा ङ्गरक घडून आला आहे असे नाही. धनवान मंडळींच्या घरी कदाचित दररोज दिवाळी साजरी होत ही असेल पण आजही अनेक घरामधील लेकरेबाळे नवी कपडे ङ्गराळ यांना वंचित असतात.हे कटू असले तरी सत्य आहे. बालसुलम कोमल मनांना आपल्या दारिद्रयाची कल्पना नसते. आपल्यालाही नवे कपडे मिळावेत. ङ्गराळ खायला मिळावा असे वाटणे स्वाभाविक असते. या बाबी आमच्या हृदयाला भिडल्या. गतवर्षी आम्ही खर्‍या खुर्‍या गरीब २५० कुटुंबांना प्रत्येक कुटुबाला ५ किलो ङ्गराळ दिपावलीच्या तीन दिवस आधी एकत्रित करुन वाटप करण्याचा उपक्रम राबविला. केवळ द्यायचा म्हणून द्यायचा असा आमचा विचार नसतो. अत्यंत उत्कृष्ठ दर्जाचे लाडू, शेव चिवडा, चकली, शंकरपाळी, खाजे असे पदार्थ बनवून ते देण्यात आले. सदरच्या समारंभाचे अध्यक्ष होते उद्योगपती मा. गिरीषभाई शहा, इचलकरंजीचे उद्योगपती मा. शामसुंदर मर्दा यांच्या शुभहस्ते आणि विख्यात उद्योजक मा. अनिल जोशी यांच्या उपस्थितीत हा हृद्य सोहळा पार पडला. सर्वस्वी संजय जोशी, राजेश सुगंधी, पिंटू मेवेकरी, विराज कुलकर्णी, शरद काकीर्डे, सुनिल खडके, गिरीष कुलकर्णी, प्रशांत तहसिलदार, तन्मय मेवेकरी, अतुल शिंगारे, अंकित भोसले, मयूर तांबे, सतिश सरनाईक यांनी हा उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यादिवशी बाहेर सर्वत्र लक्षावधी दिवे पेटलेले होते खरे पण समारंभाच्या स्थळीच्या या गरीब कुटुंबियांच्या डोळ्यांच्या पणतीत आनंदाचे कृतज्ञतेचे जे दिप झळकते त्यांचे तेज त्या लक्षावधी दिव्यांपासून अधिक तेजस्वी...

read more

रक्तदान शिबीर

Posted by on Feb 2, 2016 in Uncategorized | 0 comments

माणूस आज चंद्रावर पोहोचलाय आज सागराच्या अथांग पाण्याला छेद देत त्याच्या तळाचा धुंडोळा घेतोय पण कोणत्याही पध्दतीने कृत्रिमरित्या रक्त निर्माण करण्यात निदान आज तरी त्याला यश आलेले नाही. तर दुसर्‍या बाजुला वाहनांची भरमसाट वाढलेली संख्या नव्या रस्त्यांमुळे स्वार झालेले प्रचंड गतीचे भूत यामुळे अपघातांच्या प्रमाणात आणि पर्यायाने मृत्युंची आणि गंभीर जखमींची संख्या वाढते आहे. कॅन्सर,एडस्, टी.बी. सारख्या अन्य रोगांनी माणसाला ग्रासून टाकले आहे. तेंव्हा अपघात असो वा आजार रुग्णाला जखमींना वाचवण्यासाठी अनेकवेळा रक्ताची गरज भासते. कोणीतरी रक्तदान केल्याशिवाय कोणाचे तरी प्राण वाचत नाहीत. हे सत्य डोळ्यासमोर ठेवून यावर्षी संस्थेचे संचालक कै. अशोकराव मेवेकरी यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधत संस्थेने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. जवळपास शंभरएक रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपली जबाबदारी कर्तव्य भावनेने पार पाडली. कोल्हापूरामधील अर्पण रक्तपेढीचे या शिबीरासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य...

read more

श्रावण महोत्सव – १०८ दाम्पत्य भोजन

Posted by on Feb 2, 2016 in Uncategorized | 0 comments

संस्था आपल्या नित्य नैमित्तीक कार्याबरोबरच काही आगळे वेगळे समारंभ आयोजित करीत असते. यावर्षी आषाढ महिना अधिक मास असल्याने या वर्षी कोल्हापूर शहरातील ३३+३ दांपत्यांना भोजनाचे खास आमंत्रण देण्यात आले होते. अधिक महिन्यास आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. जे लोक या महिन्यात सत्कृत्ये करतात, परोपकार करतात त्यांच्या दु:खाचा क्षय होऊन अंती त्यांना जन्ममरणाच्या ङ्गेर्‍यातून मुक्ती मिळते अशी आपली दृढ श्रध्दा असते. या महिन्यास मलमास किंवा पुरुषोत्तम मास याही नांवांनी ओळखले जाते. या महिन्यात ३३ या आकड्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या यथाशक्ती यथामती ३३ वस्तू दान म्हणून द्याव्यात असे शास्त्रात सांगितले आहे. आपण आपल्या जामातराजाला ३३ वस्तू दान देत असतो. याचबरोबर ३३ ङ्गळे दान म्हणून द्यावीत असेही सांगितले आहे. शिवाय अन्नदानालादेखील तेवढेच महत्त्व आहे. या सर्व आणि इतर महत्त्वपुर्ण बाबींचा विचार करुन या महिन्यात ३०+३ दांपत्यांना भोजनासाठी निमंत्रीत करण्यात आले. अत्यंत उत्कृष्ठ कलात्मक पंगत रचना आणि स्वादिष्ट भोजन यांचा या दांपत्यांनी आनंद घेतला आणि संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. सदरचा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष श्री. राजू मेवेकरी-जाधव यांच्या निष्णात मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे’ या शब्दात आपण श्रावणाचे वर्णन करतो. मातृ-पितृ भक्त श्रावण बाळाच्या नांवाने हा महिना आपण ओळखतो. संस्थेने या महिन्यात १०८ दांपत्यांना भोजनासाठी खास करुन निमंत्रीत केले. समाजामधील विविध स्तरामधील १०८ दांपत्यांनी या पेशवाई थाटाच्या भोजनाचा आनंद घेतला. इथे संस्था दांपत्यामध्ये प्रकृती आणि पुरुष म्हणजेच आदिदेव आणि आदिमाता यांची कल्पना करुन अत्यंत भक्तीयुक्त अंत:करणाने हा समारंभ आयोजित करीत असते. या उपक्रमास नेहमीच लोकांचा कृतज्ञतापूर्ण प्रतिसाद लाभला...

read more

शारदीय नवरात्रोत्सव

Posted by on Feb 2, 2016 in Uncategorized | 0 comments

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव हा एक प्रमुख उत्सव मानला जातो. अश्‍विन शुध्द प्रतिपदा म्हणजे घटस्थापनेपासून ते अश्‍विन शुध्द नवमी म्हणजे खंडेनवमीपर्यंत हा उत्सव अत्यंत उत्साहात भक्तिमय वातावरणात आणि शब्दश: लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. सारी करवीरनगरी जणू आनंद वर्षावात न्हाऊन निघत असते. अशा उत्सवाच्या काळात आपणपण कांही जबाबदारी उचलली पाहिजे, नव्हे; ते आपले आद्यकर्तव्य आहे या भावनेतून संस्थेने दोन भक्ताभिमुख उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. दर्शन मंडप : मंदिराच्या आवारात दररोज हजारो भाविक दर्शन उत्सुक होऊन अनेक तास उभे असतात. ऊन-पाऊस, तहान-भुक याची त्यांना पर्वा नसते. हे खरे पण यात वृध्द असतात. आमच्या माता भगिनी असतात, लहान लहान मुले असतात, त्यांच्यासाठी काहीतरी करणे गरजेचे वाटल्यामुळे गत दोनवर्षापासून संस्थेने दर्शन मंडपाचा उपक्रम राबवण्यास प्रारंभ केला आहे. वरुन आच्छादित मंडप उभारण्यात येतो. पिण्याचे पाणी, पंखे झगमगती प्रकाश योजना यांची सोय करण्यात आल्यामुळे दर्शन रांग भाविकांना सुसह्य होते. मनोमनी त्यांच्या मनाच्या गाभार्‍यातून कृतज्ञतेचे दोन शब्द स्ङ्गुरतात, तेच आम्हाला आमची वाटचाल करण्यास अधिकच स्ङ्गुरण प्रदान करतात. कोल्हापूर ही दानशुरांची जशी भुमी आहे तशीच ती सहकाराच्या तत्त्वाने भारुन गेलेली भूमीपण आहे. इथे समाजाला एखादी योजना पटली की अंख्य ज्ञात, अज्ञात हात मदतीसाठी पुढे सरसावतात. या ही कामी संस्थेला राजारामपुरी येथील श्री स्वामी समर्थ मंडप डेकोरेशन या ङ्गर्मने आणि त्या ङ्गर्मचे श्री. विजय सुर्यवंशी आणि त्यांचे बंधू यांनी आत्मियतेने सहकार्य करुन अत्यंत देखणा असा दर्शन मंडप उभारुन दिला. त्याबद्दल संस्था त्यांची ऋणी आहे. त्र्यंबोली यात्रेनिमित्त मोफत बससेवा : असे समजण्यात येते की नवरात्रौत्सवाच्या काळात श्री महालक्ष्मी देवीने आपल्या नऊ सख्यांसह ज्यांना आपण नवदुर्गा म्हणतो, यांनी आसुरांशी भयानक रणसंग्राम करुन त्यांना यमसदनास पाठवून समस्त लोकांना भयमुक्त केले. या रणसंग्रामात देवीची अत्यंत लाडकी सखी त्र्यंबोलीदेवीने (टेंबलाईने) पराक्रमाची शर्थ करीत ‘कुष्मांडसुर’ नावाच्या राक्षसाचा वध केला खरा पण आपला हा पराक्रम देवीकडून दुर्लक्षित झाल्याची कल्पना मनात येऊन ती शहराच्या पुर्वेकडील एका टेकडीवर येऊन स्थायिक झाली. देवीच्या लक्षात हा प्रकार येताच तिची समजूत काढण्यासाठी, रुसवा दुर करण्यासाठी देवी ललिता पंचमीच्या दिवशी स्वत: त्र्यंबोली देवीकडे आली. तेंव्हापासून प्रतिवर्षी या दिवशी देवी पालखीतून आपल्या संपूर्ण वैभवासह त्र्यंबोलीकडे येते. इथे एका कुमारिकेच्या हातून त्रिशुळाच्या सहाय्याने कुष्मांडसुराचे प्रतिक मानून कोहळ्याचे तुकडे तुकडे केले जातात. पाटील घराण्यामधीलच कुमारिकेला हा सन्मान प्रदान करण्यात...

read more

शिवचरीत्र युवा पिढीसाठी काळाची गरज

Posted by on Feb 2, 2016 in Uncategorized | 0 comments

शिवरायाचे आठवावे रुप| शिवरायाचा आठवावा प्रताप॥ समर्थ रामदासांच्या ओजस्वी प्रासादिक शब्दांशब्दांमधुन हिंदवी स्वराज्य संस्थापक युग पुरुष छ. शिवाजी महाराजांचे रुप, शौर्य पराक्रम याची गाथा भरभरुन वहात असते. युगप्रवर्तक महापुरुषांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा अभ्यास त्या त्या देशांना नेहमीच प्रोत्साहित करणारा गतवैभवाच्या खुणा पटवून देणारा असल्याने असा अभ्यास होणे आणि त्यातून हाती गवसलेला अमृतकुंभ जन सामान्यांपर्यंत होचवणे हे एक राष्ट्रकार्य ठरते. अर्थात अशा महापुरुषांच्या कार्याचा धुंडोळा वास्ववतेच्या बळकट पायावर घेऊन अभ्यासाच्या सखोल साधनेतुन बळकट पायावर घेऊन अभ्यासाच्या सखोल साधनेतुन गवसलेला इतिहास मांडणे म्हणजे अत्यंत अवघड कार्य. त्यात महाराष्ट्राचेच काय पण संपूर्ण भारतवर्षाचे आराध्य दैवत असलेल्या शिवप्रभुंचे कार्य मांडणे जास्तच अवघड पण हे कार्य आपले जवळपास संपूर्ण आयुष्य वेचून सातत्याने तळमळीने करणारे एक गाढे अभ्यासक म्हणून आपण सर्वजणच डॉ. अमर आडके सरांना ओळखतो. यांची जर व्याख्यानमाला आयोजित केली तर शिवचरित्र युवा पिढीसमोर पुन्हा एकवार मांडता येईल. राजांचे शौर्य, पराक्रम राजनिती आणि रणनिती. रयतेवरील पितृवत प्रेम या गुणवैशिष्ट्यांशी नव्याने परिचय घडून येईल. या विचाराने संस्थेने श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरात तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले. याचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते श्री. प्रङ्गुल्लजी जोशी अणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदरच्या व्याख्यानमालेस युवापिढीचा उदंड प्रतिसाद लाभला. डॉ. अमर आडके इतिहासाचे गाढे अभ्यासक तर आहेतच शिवाय शिवचरित्र , शिवइतिहास, दुर्ग इतिहास यावर त्यांचे विलक्षण प्रभुत्व आहे. त्यांच्या ओघवत्या, अभ्यासपुर्ण विवेचनातून राष्ट्रभक्तीचा शिवचरित्र आणि कार्याचा अविरत वर्षाव होत राहिला. ज्यात श्रोतृवर्ग आकंठ न्हाउन निघाला. अनेक युवकांनी संस्थेकडे अशीच व्याख्यानमाला नजिकच्या भविष्यकाळात पुन्हा पुन्हा आयोजित करण्याची आग्रही मागणी केली आणि आम्ही आमच्या उद्देशात काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे समाधान...

read more

शेणीदान एक व्यवहार्य दान

Posted by on Feb 2, 2016 in Uncategorized | 0 comments

महारथी कर्णापासून आपण दानशुरत्वाच्या कथा वाचतो. जगभरात कोठे ना कोठे तरी बडी माणसं संस्था विविध कारणास्तव दान देत असतात. आपण पण आपल्या आयुष्यात आपल्या मर्यादित उत्पन्नाप्रमाणे कधी ना कधी कोठे तरी दानधर्म करत असतो. बहुतांशी लोक पैशांच्या स्वरुपात दान देत असतात. नंतर कधी शालोपयोगी साहित्य, जुने कपडे, धान्य अशा वस्तुही दिल्या जातात. पण शेणींचे दान, तेही स्मशानभुमीला ही अत्यंत व्यवहार्य पण जगावेगळी कल्पान संस्था राबवत आहे. करवीर क्षेत्र हे भुक्ति आणि मुक्ति प्रदान करणारे क्षेत्र म्हणुन जगत्मान्य आहे. जगाच्या पाठीवर जगावे कोठेही पण मरण यावे ते याच पवित्र क्षेत्री अशी अनेकांची श्रध्दा असते. ‘श्री महालक्ष्मी भक्त मंडळ, धर्मशाळा’ ही एक लोकाभिमुख काम करणारी सामाजिक संस्था या संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ६१ हजार शेणी स्मशानभुमीस दान देण्याचा संकल्प करण्यात आला. या पैकी पन्नास टक्के शेणी यावर्षी आणि उर्वरीत पुढील वर्षी दान देण्याचे ठरविण्यात आले. याचा शुभारंभ आमच्या संस्थेच्यावतीने संपन्न झाला. समारंभाचे प्रास्तविक आणि आभार प्रदर्शन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. राजू मेवेकरी यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी मा. दिलीप पाटील, भाजपा चे जिल्हाध्यक्ष श्री. महेश जाधव, नगरसेवक श्री. आर. डी. पाटील, प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे मा. गुलाबराव घोरपडे, श्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेणीदान महानगरपालिकेला करण्यात आहे. सदरच्या आगळ्यावेगळ्या समारंभास सर्वस्वी संजय जोशी, नानासाहेब नष्टे, वसंतराव पोवार, वैभव मेवेकरी, राजेश सुगंधी, पिंटू मेवेकरी, गिरीष कुलकर्णी, शरद काकिर्डे, प्रशांत तहसिलदार, विराज कुलकर्णी, मेवेकरी, मयूर तांबे, सुनिल खडके, अतुल, संजय बावडेकर, दिनेश माळकर आदि उपस्थित...

read more

देसी डोळे परी निर्मिती तया पुढे अंधार…..

Posted by on Feb 2, 2016 in Uncategorized | 0 comments

ग.दि.मांच्या एका अजरामर गीतामधील या ओळी दृष्टीआड सृष्टी म्हणतात. पण त्या भगवंतानेच जर डोळे देऊनही त्यांच्यापुढे अंधारच निर्माण केला असेल तर त्या अभाग्यांचे काय जक्षावे हे रंग त्यांच्या नशिबी नसतात. डोळ्यांपुढील काळाकभिन्न रंग हाच काय तो सोबती एक परावलंबी कधी खर्‍या तर कधी खोट्या सहानुभीतीच्या चार शब्दांच्या आधारे काठीच्या सहाय्याने टेकत टेकत जाण्याचे दुर्भाग्य यांच्या वाट्याला येते. पण सर्वच अंध असे परावलंबी बांडगुळाचे जीवन जगायला तयार नसतात. ते अंध असतात पर कर्तव्यच्यूत नसतात. कोणी खेळणी विकतो कोणी दिनदर्शिका, कोणी शिकुन नोकरी करण्यासाठी धडपडतो पण स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतो. क्रांतीसिंह नाना पाटील नगरामध्ये एक अंधांनी अंधांसाठी चालविलेली एक वससितगृह आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे विद्यार्थी दशेमधील तसेच नोकरी व्यवसायामधील अंध इथे राहतात. त्यांना दरमहा अन्नधान्याचा आधार हवा होता. जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने संस्था यात कार्यरत झाली असून दरमहा विनामोबदला धान्य त्यांना पोहचवण्यात येते. हा उपक्रम गेली चार वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. असाच काहीसा प्रकार गतीमंद मुलांच्या बाबतीत घडतो. अशा गतीमंद मुलांचे क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथे एक होस्टेल सुरु आहे. काही समाजाची बांधीलकी मानणारे तरुण हे चालवतात. त्याचे हे कार्य पाहून ंसंस्थेने या हॉस्टेलमधील मुलांच्या भोजनाची सोय व्हावी म्हणून मोङ्गत अन्न धान्य देण्याचे कर्तव्य पार पाडण्यास सुरवात केली आहे. आमचे ब्रिदवाक्य आहे ‘भक्ती परमेश्‍वराची, सेवा मानवाची’ त्याच ब्रिदवाक्याप्रमाणे आम्ही कार्यरत...

read more

निराधार अश्रापांचा आधार

Posted by on Feb 2, 2016 in Uncategorized | 0 comments

एडस्चा भस्मासूर : २०व्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकात एडस् या अतिभयानक रोगाचा भस्मासुर भानव जातीच्या मागे लागला. या रोगाच्या महाभयानकतेची कल्पना साधारणत: १९६८च्या सुमारास येऊ लागली तरी हा रोग कशामुळे होतो हे समजायला पण बराच कालावधी लागला आणि याचे एडस् हे आजचे नामकरण मे १९८६ मध्ये करण्यात आले. एचआयव्ही या विषाणूमुळे हा रोग होतो. एचआयव्ही याचे पुर्ण रुप असे आहे. ह्युमन इम्युनो डेङ्गिशियन्सी व्हायरस आणि आज आपण या महाविनाशकारी रोगाच्या पंज्यातुन सुटलो आहोत असे निश्‍चीतपणे म्हणू शकत नाही. आजवर लाखो लोक या रोगाचे बळी ठरले आहेत तर हजारो कुटुंब उध्वस्त झाली आहेत. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे :एडस हा रोग का आणि कसा होतो. त्याची लक्षणे काय, याची माहिती आज सर्वदुर पसरली आहे. इथे प्र्रश्‍न येतो तो एडस्ग्रस्त दांपत्यांच्या अपत्यांचा. आई-वडील या रोगाला का व कसे बळी पडले याचा संबंध इथे येत नाही, पण ज्या लेकरांचा कसलाही अपराध नाही अशांना केवळ ते एडस्ग्रस्त मातापित्यांच्या पोटी जन्म घेतात या अपराधाची शिक्षा भोगावी लागते. एडस्ग्रस्त स्त्री-पुरुषांकडे समाज तिरस्काराने पाहतो. त्याचे नैराश्य त्यांच्या मनात थैभान घालत असते तर त्यांच्या मुलांना त्या आगीत होरपळुन निघावे लागत असते. या आजारात मृत्यु अटळ असतो. यथायोग्य औषधोपचार, पोषक आहाराच्या बळावर त्याला काही काळ दूर ठेवता येते एवढेच. आमचे धर्मकर्तव्य: आज जगभर या भस्मासुराविरुध्दचा लढा सुरु आहे. अनेक सेवाभावी संस्था आपआपल्या पध्दतीने आपले कर्तव्य बजावित आहेत. अशीच एक संस्था म्हणजे ‘विहान’काळजी व आधार केंद्र होय. त्यांच्या कार्याची रुपरेषा समजल्यानंतर आपणपण या कामात आपले योगदान देण्याचे निश्‍चीत केले. ज्या निष्पाप निरागस मुला-मुलींच्या वाट्याला त्यांच्या पालकांकडून या रोगाची लागण झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी आम्ही पुढे सरसावलो. आम्ही आमच्या ट्रस्टच्या वतीने मोङ्गत अन्नछत्र चालवतोच, आता या अश्रापांच्या मुखीपण पौष्टीक आहार जावा या हेतुने आम्ही अशा १०० मुला-मुलींच्या पोषण आहाराची जबाबदारी उचलली आहे. सोयाबिन, शेंगदाणे, गुळ, मटकी, खजुर, नाचणी, मुग यांचा सामवेश अशा पोषक आहारात होतो आणि असा आहार देण्याची जबाबदारी संस्थेने उचलली आहे. मानवतेची सेवा हाच खरा धर्म असे म्हटले जाते याच आधारावर आम्ही पण या कार्याला आमचे धर्मकर्तव्य मानले आहे आणि एकदा आम्ही हे असे असिधरा व्रत स्वीकारले की त्यात तसुभरही आळस करत...

read more
Powered By Indic IME