गरजु मुलांना दिवाळी निमित्त कपडे वाटप

Dipawali nimitta kapade vatap

Dipawali nimitta kapade vatap


आज मध्यमवर्गीय मंडळी, श्रीमंत धनवान यांना कदाचित दिवाळी नित्याची बाब वाटत असेल पण आज हे या समाजात अशी अनेक कुटुंबे आहेत जी ज्यांना रोज दोन घास पोटात गेले तरी ती दिवाळीचे असल्याचे वाटते. तर इतर मुले छान छान नवीन कपडे घालून मिरवताना पाहून अशा गरजू गरीब मुलांच्या चेहर्‍यावरील दु:खाचा काळोख लक्षावधी पण त्यांचा लखलखीत प्रकाशही दूर करु शकत नाही. हे दु:ख ही व्यथा आमच्याही काळजाला स्पर्शून गेली.
आम्ही झपाट्याने कामाला लागलो. अशा तीनशे गरीब गरजु मुला मुलींना नवे कपडे सुगंधी साबण आणि तेल वाटपाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. या उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी शहर पोलिसप्रमुख श्री. विठ्ठल पोवार साहेब लाभले. श्री. राजेश लाटकर, श्री. महेश जाधव यांच्या सारखे समाज सेवकाची भुमिका बजावणारे नगरसेवक, श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष मान. श्री. एस. के. कुलकर्णी, श्री. नंदकुमार मराठे आदि मान्यवर उपस्थित होते. उपक्रमामध्ये बोलताना श्री. विठ्ठल पोवार साहेबांनी गौरवोद्गाराने संस्थेला शुभेच्छा दिल्या. त्या निरागस मुला मुलींच्या चेहर्‍यावर पसरलेली हास्यचांदणी दिवाळीच्या आमावस्येला काळोखाला धुवुन काढून गेली.

Powered By Indic IME