वर्धापन दिन

वर्धापन दिन

वर्धापन दिन


कोणत्याही संस्थेच्यादृष्टीने संस्थेचा वर्धापन दिन हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. श्री सत्यनारायण महापुजा आणि स्नेह भोजन याद्वारे संस्थेचा वर्धापन दिन भावपुर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री सत्यनारायण महापुजा श्री. प्रशांत तहसिलदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वर्षभर सातत्याने आमच्या विविध उपक्रमांना सक्रिय पाठिंबा आणि सहकार्य करणार्‍या विविध रुपांनी मदतीचा हात सदैव पुढे करणार्‍या आमच्या दात्यांना या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणुन आमंत्रीत करण्यात आले होते. खरे म्हणजे या हाताने केलेले दान दुसर्‍या हातासही कळू नये हीच आमच्या आश्रयदात्यांची भावना असते. पण आपल्या कार्याचा हा अप्रत्यक्ष झालेला गौरव त्यांची मने पण सुखावुन गेली.

Powered By Indic IME