लाडू प्रसाद विक्री शुभारंभ

लाडू प्रसाद विक्री शुभारंभ

लाडू प्रसाद विक्री शुभारंभ


श्री तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी जाऊन परतलेल्या भाविकाकडे प्रसाद म्हणून लाडू ध्यावा ही मागणी होताना आपण नेहमीच पाहत आलो आहोत. प्रसादाच्या पदार्थांपेक्षा त्याच्या प्रसाद रुपाचे आकर्षण म्हणूनच वाटत आलेले असते. रोजचाच शिरा पण तो जेव्हा सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून हातावर पडतो तेव्हा त्याची चव अविट बनलेली असते. हे सर्व जरी पदार्थ असले तरी गायीच्या शुद्ध तुपात बनवलेले लाडू प्रसाद म्हणून श्री महालक्ष्मीच्या दर्शनास येणार्‍या भाविकांना मिळावेत अशी मागणी सुरु झाली. अन्नदानाची कल्पना नि:स्वार्थपणे राबवली जात असल्याचे पाहून मागणीस आणखीनच उत्तेजन लाभले.
म्हणूनच दर्जात कोणतीही तडजोड न करता ‘ना नङ्गा ना तोटा’ या तत्तावर असा प्रसाद उपलब्ध करुन देण्याची योजना संस्थेने कार्यान्वित केली. संत गाडगेबाबा चौकात संपन्न झालेल्या या मधुर समारंभाच्या उदघाटक होत्या करवीरच्या महापौर मा. सौ. प्रतिभाताई नाईकनवरे, कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती मा. श्री. रमेश पोवार, श्री. आर. के. पोवार, नगरसेवक श्री. संभाजी जाधव, नगरसेवक श्री. आर. डी. पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक सेवक वर्ग आणि इतर मान्यवर या समारंभाला आवर्जून उपस्थित होते. लाडू प्रसादाचा दर्जा पाहून सर्वच भक्तांनी समाधान व्यक्त केले.

Powered By Indic IME