nav-left cat-right
cat-right

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवेचे यशस्वी दुसरे वर्ष

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवेचे यशस्वी दुसरे वर्ष पूर्ण.

हजारो भाविकांनी घेतला लाभ

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट (रजि) ही संस्था गेली दोन वर्षे श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत आहे.तसेच महालक्ष्मी मंदिरातील प्रत्येक उत्सवामध्ये श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते सक्रिय सहभागी असतात.श्री दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात.या भाविकांसाठी आपणही खारीचा वाट्याने काम करायचे, भाविकांना जास्तीतजास्त सेवा उपलब्ध करून द्यायची, हा या मागचा ट्रस्टचा हेतू आहे.
आम्ही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी भाविकांना मोफत भोजनाचा लाभ व्हावा म्हणून श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टची स्थापना केली आहे.या माध्यमातून भाविकांना पोटभर मोफत भोजन देत आहोत.पण इथे रोज  अन्नछत्र चालू करणे हे काम थोडे कठीण आहे.म्हणून आम्ही महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेस हे अन्नछत्र चालू करण्याचे ठरवून प्रत्यक्षात जानेवारी २००८ साली शाकंभरी पार्णिमेच्या निमित्ताने साधारणपणे १००० ते १५०० भाविकांना या मोफत प्रसादाचा लाभ मिळावा, असे नियोजन केले या भोजन प्रसादामध्ये पांढरा भात / वरण / आमटी / मसालेभात / गव्हाची खीर / भोपळ्याचे भरीत / लोणचे असे पदार्थ ठेवून सुरूवात केली.विशेष म्हणजे कोणत्याही पदार्थामध्ये कांदा, लसूण वापरला जात नाही.श्री महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने शेकडो हात मदतीसाठी पुढे आले.स्थानिक व परस्थ भाविकांनी हस्ते-परहस्ते मदत करून या पवित्र कार्यास सहकार्य केले म्हणून आम्ही हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ देवू शकलो.हे सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले.भोजनाचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक भाविकाने समाधान व्यक्त केलेच, तसेच आपला अभिप्रायही लिहून ठेवला.भविष्यात याची व्याप्ती वाढविण्याचा विचार असून पौर्णिमेनंतर, दर शुक्रवारी हे अन्नछत्र सुरू राहणार आहे.पण गोवर्धन उचलणे एकट्या ट्रस्टला झेपणारे काम नाही.यासाठी समाजातील दानशूर मंडळींनी पुढाकार घ्यावा.आम्हांस सहकार्य करून श्री महालक्ष्मीच्या भाविकांची सेवा करावी,

ही विनंती.

Leave a Reply

Type Comments in Indian languages (Press Ctrl+g to toggle between English and Hindi OR just Click on the letter)
Powered By Indic IME