nav-left cat-right
cat-right

मनोगत

raju-mevekariकरवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मंदिरा परिसरामध्ये साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक उत्सवामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते सहभागी होत असतो.यावेळेस अनेक भक्तगणही देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले असतात.कितीही गर्दी असूदे हे लोक भक्तिच्या रसाने ओथंबून मनोभावे देवीची आराधना करत असतात.त्यामानाने त्यांच्यासाठी आपल्याकडून काही सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत, ही खंत आमच्या मनात होती.महाराष्ट्रात इतर धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी अन्नछत्र मोफत चालू असते.पंरतु महालक्ष्मीचे देवस्थान इतके प्रसिध्द असूनही येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाची सोय असावी असे काही भाविकांचे मत होते.

या मुद्दाल्या अनुसरून आम्ही काही समविचारी कार्यकर्ते एकत्र येऊन मोफत अन्नछत्र चालू करावे का? असा विचारविनिमय केला.करायची इच्छा तर होतीच, पण म्हणावे तितके सोपे नव्हते.परंतु आम्ही हार न मानता जिद्दीने ‘श्री शाकंभरी पोर्णिमा’ सन २००८ रोजी प्रथम अन्नछत्राची सुरूवात केली.
पण हे सर्व सुरू करीत असताना सर्वात मोठा प्रश्न होता जागेचा, यानंतर आर्थिक बाबीचा परंतु श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचा सर्व पदाधिकाऱ्यानी आमचा सर्वात मोठा प्रश्न सोडवून प्रसादासाठी संस्थेची जागा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.महालक्ष्मी भकत मंडळाचा अन्नछत्रासाठी फार मोठा वाटा आहे.सुरूवातीस प्रसादावेळी काही आर्थिक अडचणी येत होत्या; पण त्यावर मात करून आम्ही व सहकाऱ्यांनी हे आव्हान पेलून नेले, पण नंतर त्यामध्ये सर्वांचा प्रतिसाद वाढत गेला.

एवढा चांगला उपक्रम पाहून भाविकांनी स्वतःहून मुक्तहस्ते सहकार्य केले.त्यांच्यामुळे आम्ही यशस्वी दोन वर्षे पूर्ण करू शकलो.भक्तांच्या मागणीनुसार व वाढत्या प्रतिसादामुळे हा प्रसाद फक्त पोर्णिमेस न करता प्रत्येक शुक्रवारी हे अन्नछत्र सुरू ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला.
आजपर्यंत जसे आपण आम्हांस सहकार्य केले तसेच इथून पुढेही करत रहाल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो

धन्यवाद,

आपला नम्र,
राजू मेवेकरी
अध्यक्ष, श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट.

8 Responses to “मनोगत”

  1. admin says:

    Hello All, We have got Income Tax 80G Certificate Now all your donations are Income Tax Free. Please donate for Good Cause.

  2. Vijay Shastri says:

    I appreciate trust members efforts to serve Devi Bhaktgan. I wish you all the best and pray to almighty to give you and other trust members strength and resources to do this noble work forever.

    Vijay Shastri
    Kolhapur-Mumbai-Doha

  3. sangeeta joshi says:

    your best thoughts mahalakxmi bhaktas are worked out in best way. you people are working very well and in displined manner. please obtain permission towards 80G so that it will be easy to donate the amount.

    sangeeta joshi
    pune.

  4. milind s chouknis says:

    it is very good attempt . we are waiting for it and I am sure it will definitely become populer.

  5. Vinay Dharmadhikari says:

    This is a great service to visitors of the temple ….I really wish to congratulate you on the excellent work you are doing … Best wishes to all the members of the trust

  6. admin says:

    You do great work,lots of wishes

    Avinash Viresh Vastrad
    Solapur

  7. admin says:

    Food Donation is the best Donation & You Create Social Engineering through this,
    thank you

    Narsingh Kondiba sodgir
    Tal : Ahmedpur
    Dist : Latur

  8. admin says:

    Prasad given by Mahalaxmi Mandir trust to bhaktas is very good.
    Harish Chandra Govind Kulkarni

Leave a Reply

Type Comments in Indian languages (Press Ctrl+g to toggle between English and Hindi OR just Click on the letter)
Powered By Indic IME