नम्र आवाहन

दैनदिन अन्नदान यज्ञासाठीच्या अन्नछत्राचा शुभारंभ

Raju-mevekari

Raju-mevekari

शक्तिपीठे : तंत्र चुडामणी नांवाच्या ग्रंथामध्ये शक्तिपीठांची उत्त्पत्ती कशी झाली याची सविस्तर माहिती मिळते. दक्षाच्या ‘बृहस्पती‘ नामक यज्ञप्रसंगी सतीने संतापाच्या भरात स्वत:ला अग्निकुंडात झोकून दिल्याचे समजल्याने संतापलेल्या भगवान शंकराने यज्ञाचा दक्षासह विध्वंस करुन सतीचे कलेवर उचलुन तांडवनृत्य करत त्रैलोक्यात भ्रमण केले पण भगवान विष्णुंना हे न आवडल्याने त्यांनी सुदर्शन चक्राच्या सहाय्याने सतीच्या कलेवराचे ५१ तुकडे केले. ते ज्या ज्या स्थळी पडले त्या त्या स्थळी शक्तिपीठे निर्माण झाली. अगदी बलुचिस्थान पासून कलकत्त्याच्या कालीपीठापर्यंत ही स्थाने आहे.

महाराष्ट्रात आदिमातेची साडेतीन पीठे आहेत. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) तुळजापुरची तुळजाभवानी, माहुरगडची रेणुका ही तीन पुर्ण शक्तीपीठे असुन वणीच्या सप्तश्रृंगीस अर्धेपीठ मानले गेले आहे. यांचा स्पष्ट उल्लेख देवी भागवताच्या सातव्या स्कंधामधील ३१व्या अध्यायात आढळतो. मत्स्य, पदम् व स्कंध पुराणांमध्ये ही करवीरच्या शक्तिपीठाचे उल्लेख आढळतात.

अशा या पुराणकालापासुन प्रख्यात असलेल्या करवीर नगरी इतिहासपण तितकाच दैदिप्यमान आहे. छ. शिवरायांच्या स्नुषा ताराऊसाहेबांनी करवीर संस्थानाची स्थापना केली. या संस्थानाचे नंतरचे अधिपती राजर्षि छ. शाहू महाराजांनी संस्थाननाची आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, कृषिविषयी, सांस्कृतिक आदी सर्वच क्षेत्रात लक्षणिय प्रगती साधत करवीर संस्थानाच्या नावाचा एक आदरयुक्त दरारा निर्माण केला.

अन्नछत्राची आवश्यकता : अशा या नगरीस भेट देण्यासाठी श्री महालक्ष्मीचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी असंख्य प्रवासी, पर्यटक, भक्त दरवर्षी येत असतात आणि दर्शनमात्रे समाधान पावत असतात. शिर्डी, शेगांव, अक्कलकोट सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये भाविकांसाठी मोङ्गत किंवा नाममात्र मोबदला घेऊन ज्याप्रमाणे अन्नछत्रे चालविली जातात. अशा अन्नछत्राचा इथे मात्र अभाव होता. याची प्रकर्षाने जाणिव झाल्यामुळे अशाप्रकारचे अन्नछत्र सुरु करण्याच्या कल्पनेचे बीज रुजु लागले. परिणामत: काही समविचाराच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेल्या विचारमंथनातून जानेवारी २००८ मध्ये शाकंभरी पौर्णिमेचा शुभमुहुर्त साधत ‘श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट’ चा अमृतकलश साकारला.

सुरवातीला असे ठरले की प्रत्येक पौर्णिमेला परगावाहून आलेल्या भक्तांना मोङ्गत अन्नदान करायचे त्याप्रमाणे दर पौर्णिमेला सुमारे दोनशे भाविक याचा लाभ घेऊ लागले. साधारणत: २०१० साली दर पौर्णिमेसह दर शुक्रवारी पण अन्नदानाची प्रथा सुरु केली. २०११ पासून यांना मंगळवार, शनिवार आणि रविवार हेही दिवस जोडण्यात आल्याने आठवड्यातील चार दिवस अन्नछत्र सुरु झाले. हे अन्नछत्र श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या हॉलमध्ये सुरु होते. पण उत्कृष्ठ नियोजन, दर्जेदार सात्वीक आहार यामुळे अन्नछत्राची ख्याती सर्वदूर पसरल्यामुळे दररोज भक्तगणांची संख्या वाढत गेल्यामुळे सुयोग्य, प्रशस्त जागेची गरज निर्माण होऊन अशा जागेचा शोध सुरु झाला.

नव्या जागेत स्थलांतर : अशातच कोल्हापूर महानगरपालिकेचा कपिलतीर्थ भाजी मंडईमधील एक हॉल बरीच वर्षे बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याने नाममात्र भाडे आकारून हा हॉल संस्थेला मिळावा यासाठी नगरसेवक, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी गाठीभेठी सुरु झाल्या. संस्थेची बाजू समजाऊन सांगण्यात संस्था यशस्वी तर झालीच पण संस्थेचे कार्यच लख्ख सुर्यप्रकाशासारखे असल्याने महानगरपालिकेच्या महासभेत हा हॉल संस्थेला देण्याविषयीचा ठराव एकमुखाने संमत केला गेला. आता संस्था झपाट्याने कामाला लागली. हॉलचे सुशोभीकरण कमीवेळात पूर्ण करण्यात आले.सर्व तयारी झाल्यानंतर अन्नछत्राचे नव्या जागेत स्थलांतर करण्यात आले.

तो शुभदिवस होता दि. ११ एप्रिल २०१२ , चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडवा भारतीय कालगणनेचा प्रारंभ या शुभमुहुर्तावर तिरुपती बालाजी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी मा. एल. व्ही. सुब्रहमण्यम (आय.ए.एस) यांच्या शुभहस्ते दैनंदिन मोङ्गत अन्नदान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्षस्थान तत्कालीन महापौर सौ. जयश्रीताई सोनवणे यांनी भुषविले होते. या समारंभास श्री पुजक श्री. अजित ठाणेकर, महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. संजय हेरवाडे, प. महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या श्रीमती पदमजा तिवले, नगरसेवक श्री. आर.डी. पाटील, मा. जयंत पाटील, पॉप्युलर स्टील वर्क्सचे श्री. राजू जाधव, महालक्ष्मी भक्त मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष श्री. एस. के. कुलकर्णी या मान्यवरांसह अनेक नागरिक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजू मेवेकरी यांनी अत्यंत भावपुर्ण शब्दात प्रास्ताविक करताना अनेक बाबींवर प्रकाश तर टाकलाच पण आभार प्रदर्शनात सर्वच सहाय्यकारी घटकांचे मन:पुर्वक आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु असतानाच याच हॉलच्या शेजारीच बंद अवस्थेत असणारा आणखी एक हॉल संस्थेला कोल्हापूर महानगरपालिकेकडून त्वरीतच उपलब्ध करुन दिल्यामुळे कार्याची व्याप्ती वृध्दिंगत होत गेली आहे. हा अन्नछत्राचा जगन्नाथाचा रथ ओढणे हे काही एका दुसर्‍या व्यक्तीचे कार्य नाही पण आम्हाला इथले सर्वसामान्य लोकांपासून धनिक दानशुर व्यक्ती, विविध तालीम संस्था, सामाजिक संस्था, सर्वच राजकीय पक्ष, इ. अनेकांचे अत्यंत महत्त्वपुर्ण सहकार्य लाभल्यामुळे हा रथ ओढणे शक्य झाले आहे याची संस्थेला जाणिव आहे.

प्रगतिचा वाढता आलेख : २००८ साली सुरु झालेल्या कार्याची व्याप्ती जसजशी वाढत गेली तसेतशी आर्थिक उलाढालपण वृध्दींगत होत राहिली.

आर्थिक वर्ष वार्षिक उलाढाल
२००९-२०१० रु. १ लाख ५० हजार
२०१०-२०११ रु. १० लाख १६ हजार
२०११-२०१२ रु. २३ लाख ६५ हजार
२०१२-२०१३ रु. ६८ लाख २९ हजार
२०१३-२०१४ रु. १ कोटी ३४ लाख
२०१४-२०१५ रु. १ कोटी ६४ लाख

सामाजिक बांधिलकी : अन्नछत्रासह संस्था सामाजिक बांधिलकी जोपासताना अनेक सामाजिक, धार्मिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. यात एडसग्रस्त मुलामुलींना दत्तक घेणे, अंध गतिमंद मुलांच्या संस्थेला मोङ्गत अन्नधान्य पुरवणे, २५० गरीब कुटुंबाच्या घरात मोङ्गत ङ्गराळ देऊन त्यांच्या आनंदाचे दिप प्रज्वलित करणे, छ. शिव जयंती साजरी करणे, शारदीय नवरात्र उत्सव, त्र्यंबोली यात्रेत भाविकांसाठी मोङ्गत बसची व्यवस्था, स्मशानभुमिस शेणीदान, हळदी-कुंकु, गरीब गरजू लोकांना वैद्यकीय, शैक्षणिक मदत, रक्तदान शिबीर इ. विधायक कार्यक्रमांचा समावेश होतो. संस्थेचा कारभार हा अत्यंत पारदर्शी असून एकदिलाने कार्य सुरु आहे. याची पोचपावती म्हणून संस्थेला आय.एस.ओ. ९००१-२००८ मानांकन लाभले आहे.

संपूर्ण देशात असे मानांकन लाभलेले हे एकमेव अन्नछत्र आहे. ‘भक्ती परमेश्‍वराची-सेवा मानवाची’ हे ब्रीदवाक्य असणार्‍या आम्हांस सार्थ अभिमान आहे

 • http://www.agnisdesigners.com/ Agnis Designers

  Hello Sir,

  Please Conatct Mr Prafull Munishwar Refer My Name Girish Baraskar – Web Designer his Mobile No. is 9823053802. He is hereditary Pujaris of Shree Mahalaxmi Devi (Ambabai).

  Thank You

 • Venu Venkataramana

  Hi

 • Venu Venkataramana

  I would like to come to kolhapur for mahal axmi darshan on 15th August, Friday. Is it possible for darshan on that day. Any spl darshan with payment is possible. Any spl pooja can be performed. Give full details

Powered By Indic IME