महालक्ष्मी मंदिरातील दिनचर्या

पहाटे ४.४० मंदिर उघडते.
पहाटे ४.४५ ते ५.३० पाद्यपूजा (मुखमार्जन) व काकड आरती
सकाळी ९.०० पहिला महाभिषेक, आरती व शंखतीर्थ
यानंतर श्री देवीची अलंकार पूजा (दागिन्यांनी सजविलेली पूजा) बांधली जाते.
सायंकाळी ८.१५ आरती व शंखतीर्थ
या आरतीनंतर अलंकार पूजा उतरविली जाते.
रात्रौ १०.१० शेजारती व तीर्थ
रात्रौ १०.३० मंदिर बंद होते.

पालखी सोहळा

प्रत्येक शुक्रवारी रात्रौ ९.३० वा. देवीची पालखीतून मंदिर प्रदक्षिणा असते. शारदीय नवरात्रोत्सवात सर्व दिवस पालखी सोहळा होतो. नवरात्रोत्सवातील पंचमी दिवशी देवीच्या मंदिरातून श्री त्र्यंबोली मंदिरापर्यंत व तेथून परत असा पालखी सोहळा होतो. नवरात्रोत्सवातील अष्टमी दिवशी वाहनातून देवीची नगरप्रदक्षिणा होते.
विजयादशमी दिवशी देवीच्या मंदिरातून ऐतिहासिक दसरा चौकापर्यंत, तेथून पंचगंगा नदीच्या घाटावर व तेथून पुन्हा मंदिरात असा पालखी सोहळा होतो. अश्‍विन पोर्णिमेपासून माघ पोर्णिमेपर्यंत शुक्रवारसहित प्रत्येक पोर्णिमेलाही पालखी सोहळा होतो. कार्तिक प्रतिपदा ते पौर्णिमा यामध्ये येणारे पालखी सोहळे हे ८.४५ वाजता होतात. कार्तिक पौर्णिमेपासून रथसप्तमीपर्यंत येणारे पालखी सोहळे हे ९.१५ वाजता होतात. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर आरती व त्यानंतर शेजारती होते.

कार्तिकमास

पहाटे २.३० पासून मंदिराचे आवारातील सर्व देवतांपुढे कापूर लावला जातो व मंदिराचे शिखरावर काकड पाजळला जातो.
संपूर्ण कार्तिकमासात मंदिर पहाटे ३.३० वा. उघडते.
पहाटे ३.३० ते ४.३० पाद्यपुजा व काकड आरती
सकाळी ६.०० पहिला महाभिषेक, आरती व शंखतीर्थ
दुपारी १२.०० दुसरा महाभिषेक, आरती, महानैवेद्य व शंखतीर्थ
सायंकाळी ७.४५ आरती व शंखतीर्थ
रात्रौ ९.१५ शेजारती.

Comments are closed.

Powered By Indic IME