नम्र आवाहन

Mahalaxmi Annachhatra Seva Trust Kolhapur

New Hall for Meals

संपूर्ण भारतभर श्रीदेवीचे ५१ शक्तीपीठे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत. या पीठांमध्ये कोल्हापूर, तुळजापूर, माहूर-वणी या पीठांचा समावेश असून त्यामध्ये माहूर-वणी हे पूर्ण शक्तीपीठ आहे.

श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी रणरागिणी ताराराणी यांनी करवीर संस्थानाची स्थापना केली. लोकराजा राजर्षि शाहू छत्रपती महाराज यांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या संकल्पनेतून निर्माण झालेली ही नगरी म्हणूनच देवीचे मातृपीठ असून या नगरीस कलानगरी असे संबोधतात. श्री महालक्ष्मी अंबाबाई दर्शनासाठी हिंदुस्थानाच्या काना-कोपर्‍यातून लाखो भक्त दरवर्षी कोल्हापूर नगरीस भेट देत असतात. यथासांग देवीचे दर्शन घेऊन जात असतात. परंतु आमच्या मनामध्ये एक खंत सलत होती ती म्हणजे अन्नछत्राची. हिंदुस्थानातील विविध तीर्थक्षेत्रे व धार्मिक ठिकाणी अन्नदानाची परंपरा आहे. अन्नदान हेच पुण्यदान या श्रद्धेतून शेगांव, शिर्डी, अक्कलकोट तसेच इतर बर्‍याच मंदिराठिकाणी अन्नदान केले जाते पण आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये ही व्यवस्था नाही. म्हणून समविचारी कार्यकर्तेएकत्र येऊन जानेवारी २००८ शांकभरी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रथम प्रत्येक पौर्णिमेदिवशी अन्नदान सुरू केले. दोन वर्षानंतर हा उपक्रम यशस्वी झालेनंतर जानेवारी २०१० साली प्रत्येक शुक्रवारी हा अन्नदानाचा उपक्रम सुरु केला. यासाठी स्थानिक व परस्थ भक्तांनी आपल्या कुवतीनुसार आर्थिक व वस्तुरुपात मदत केली म्हणून हा उपक्रम यशस्वी करु शकलो. नंतर भक्तांचा वाढता प्रतिसाद, दुरवर झालेली चांगली ओळख या बळावर आम्ही जानेवारी २०११ सालापासून प्रत्येक मंगळवार व प्रत्येक शुक्रवार अन्नछत्र सुरु केले. हे काम थोडे धाडसाचे होते. पण माझ्या सर्व सहकारी मित्रांनी भरपूर मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वीपणे चालू ठेवला आहे.

जानेवारी २०१२ पासून संस्थेच्या ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त हा उपक्रम प्रत्येक मंगळवार, शुक्रवार बरोबर प्रत्येक रविवारी सुद्धा सुरु केला. अशाप्रकारे मार्च २०१२ अखेर आठवड्यातून तीन दिवस व प्रत्येक पौर्णिमा या दिवशी हा उपक्रम सुरु असून अंदाजे या दिवशी ८०० ते १००० भक्तगण अन्नग्रहण करतील अशी व्यवस्था केली आहे. सध्या दर मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमेबरोबर शनिवारीही अन्नछत्र सुरु आहे.

Mahalaxmi Annachhatra

आभार

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट यांच्यावतीने चालू असलेल्या मोङ्गत अन्नछत्रासाठी कोल्हापूरातील प्रतिथयश उद्योगपती, उद्योजक, व्यापारी वर्ग व सामान्य भक्तगण व ज्ञात अज्ञात भक्तांच्या सहकार्यामुळेच आम्ही अन्नछत्र उपक्रम यशस्वी करु शकलो. यांच्या ऋणामध्ये राहण्यास आम्हाला सदैव आनंद आहे. तसेच कोल्हापूरातील लोकप्रिय वृत्तपत्र दै. पुढारी, दै. सकाळ, दै. तरुण भारत, दै. लोकमत, दै. पुण्यनगरी, दै. महासत्ता, दै. सामना, दै. नवाकाळ, बी न्यूज, झी मराठी, आयबीएन लोकमत, दूरदर्शन, ई. टी. व्ही., स्टार माझा, मी मराठी, एसपीएन नेटवर्क यांनी वेळोवेळी या उपक्रमाची माहिती सर्वांपर्यंत योग्यरित्या पोहोचवली. त्यामुळे आम्हांला प्रोत्साहन मिळाले. त्याचबरोबर श्री महालक्ष्मी भक्त मंडळ (धर्मशाळा) सर्व पदाधिकारी व संचालक, कर्मचारी वर्ग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पदाधिकारी व सदस्य, कर्मचारी वर्ग वरील सर्वांच्या सहकार्यामुळेच हा मोङ्गत अन्नछत्राचा उपक्रम यशस्वी होत आहे. या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.

Kolhapur Navratri 2012
Powered By Indic IME